टी-२० : भारत इंग्लंडला देणार धक्का? India vs England 2012: Mumbai T20I - Preview

टी-२० : भारत इंग्लंडला देणार धक्का?

टी-२० : भारत इंग्लंडला देणार धक्का?
www.24taas.com, मुंबई

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान आज वानखेडेवर दुसरी टी-२० मॅच खेळली जाणार आहे. दोन मॅचच्या या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाला अखेरची टी-२० जिंकून सीरिज जिंकण्याची नामी संधी आहे. टेस्ट सीरिजमधील लाजिरवान्या पराभवानंतर आता धोनी अॅन्ड कंपनी टी-२० सीरिज तरी निदान जिंकते का? याकेडच भारतीय क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहीलंय.

पहिल्याच टी-20मध्ये विजय मिळवत धोनी अॅन्ड कंपनीने आपल्यामागे लागलेला पराभवाचा सिसेमिरा मोडीत काढला. आता पुण्यापाठोपाठ मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या टी-२०मध्ये विजय मिळवण्याची नामी संधी टीम इंडियाला आहे. सिक्सर किंग युवराज सिंग टीम इंडियासाठी पुन्हा एकदा मॅच विनरची भूमिका बजावू शकतो. म्हणूनच पुन्हा एकदा युवीच्या ऑल राऊंडर कामगिरीवर साऱ्या आशा केंद्रीत झाल्या आहेत.

गौतम गंभीर आणि अंजिक्य रहाणेवर पुन्हा एकदा टीम इंडियाला आक्रमक सुरूवात करून देण्याची जबाबदारी असेल. तर युवराज सिंग, विराट कोहली, सुरेश रैना आणि महेंद्र सिंग धोनीवर मिडल ऑर्डरची धुरा असेल. बॉलिंगमध्ये आर. अश्विन, पियूष चावला, रविंद्र जडेजासह अशोक डिंडा या फास्टर बॉलरच्या खांद्यावर जबाबदारी असेल तर दुसरीकडे अॅलेक्स हेल्स, ल्यूक राईट, ईयान मॉर्गनवर बॅटिंगची भिस्त असणार आहे. टीम ब्रेसनन आणि स्टुअर्ट मेकर हे इंग्लिश बॉलर्स टीम इंडियाच्या बॅट्समनला रोखण्याचा प्रयत्न करतील.

टेस्ट सीरिज गमावल्यानंतर पहिली टी-२० जिंकल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास आता नक्कीच वाढला असेल. दुसरीकडे इंग्लंड टीम आता अधिक सतर्क झाली असेल. म्हणूनच टीम इंडियाला निर्धास्त न राहता पुन्हा एकदा इंग्लिश ब्रिगेडवर मात करून सीरिज जिंकण्याचं आव्हान असेल

First Published: Saturday, December 22, 2012, 16:12


comments powered by Disqus