आज न्यूझीलंडबरोबर टी-२०ची लढाई..., India vs New Zealand 1st T20: Preview

आज न्यूझीलंडबरोबर टी-२०ची लढाई...

आज न्यूझीलंडबरोबर टी-२०ची लढाई...
www.24taas.com, विशाखापट्टणम
टीम इंडिया आणि न्यूझीलंड दरम्यान आता टी-२०ची लढाई रंगणार आहे. दोन टी-२०च्या सीरिजमधील पहिली टी-२० ही विशाखापट्टण इथं होणार आहे. युवराज सिंगचं कमबॅक क्रिकेट चाहत्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. तर भज्जीनेदेखील टीममध्ये कमबॅक केलंय.

टेस्ट सीरिजमध्ये न्यूझीलंडला व्हॉईटवॉश दिल्यानंतर ‘मेन इन ब्लू’ सज्ज आहेत ते टी-२० च्या लढाईसाठी... विशाखापट्टणम इथं टीम इंडिया आणि न्यझीलंड दरम्यान पहिली टी-२०मॅच खेळली जाणार आहे. या मॅचच प्रमुख आकर्षण असणार आहे ते युवराज सिंग... कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून बरा झाल्यानंतर युवी प्रथमच मॅच खेळणार असल्याने तमाम क्रिकेटप्रेमींच त्याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. याचबरोबर हरभजन सिंगदेखील प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटप्रेमींना खेळताना पहायला मिळणार आहे. दरम्यान, भज्जीसमोर चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. सेहवाग-गंभीरला भारताला दमदार सुरूवात करून द्यावी लागेल. तर धोनी, युवी, कोहली यांच्यावर मिडल ऑर्डरची भिस्त असेल. टेस्टमध्ये खराब कामगिरी केलेल्या रैनाच्या जागी रोहितला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर आर. अश्विन, भज्जी, झहीरवर बॉलिंगची जबाबदारी असेल. याशिवाय युवीबरोबरच इरफान पठाण हा ऑल राऊंडरही धोनीच्या मदतीला असेल.

तर दुसरीकडे टेस्टनंतर टी-२० मध्ये विजय मिळवून आपली प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान किंवीसमोर असेल. रॉस टेलर, ब्रँडन मॅककलम, मार्टिन गप्टिल यांचं आक्रमण रोखण्याचं आव्हान टीम इंडियाच्या बॉलर्ससमोर असणार आहे. तर नाथन मॅककलमच्या रूपात एक तगडा ऑल राऊंडर त्यांच्याकडे आहे. दरम्यान, टीममध्ये कमबॅक केलेल्या डॅनिएल व्हिटोरीच्या फिरकीचा धोकाही टीम इंडियाला असेल. याशिवाय टीम साऊथी आणि डग ब्रेसवेल यांचा भेदक माराही टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो. आता टी-२०च्या लढाईतही टीम इंडिया आपल्या विजयाची मालिका कायम राखते का किवी ही मालिका खंडित करते हे पाहण रंगतदार ठरणार आहे.

First Published: Saturday, September 8, 2012, 08:10


comments powered by Disqus