इंडिया-पाक मॅचवर पावसाचं सावट, India Vs Pak second ODI in kolkata

इंडिया-पाक मॅचवर पावसाचं सावट

इंडिया-पाक मॅचवर पावसाचं सावट
www.24taas.com, कोलकाता

कोलकताच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर पावसाच सावट आहे. आज दुपारी बारा वाजता ही मॅच होते आहे. तत्पूर्वी आज पहाटेपासून कोलकात्यात पावसाने हजेरी लावली आहे. मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला असल्याने ईडन गार्डनवरील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच मॅचला सुरवात होईल.

पावसामुळं मॅच उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे. ईडन गार्डनवर भारत-पाकिस्तानमध्ये सीरिजची दुसरी वनडे रंगणार आहे. सीरिजमध्ये १-०नं पिढाडीवर असणाऱ्या टीम इंडियासाठी ही लढत करो वा मरो अशीच असणार. तर पाकिस्तानी टीम कोलकात्यातच सीरिज जिंकण्यासाठी आतूर असणार आहे.

या नव्या वर्षात क्रिकेटच्या मैदानातलं पहिलं बिगूल वाजणार आहे ते पाकिस्तानविरुद्धच्या लढाईनं. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तानमधल्या दुसऱ्या वन डेत या वर्षातली पहिली लढाई आज रंगणार आहे.

First Published: Thursday, January 3, 2013, 11:21


comments powered by Disqus