भारत वि. वेस्ट इंडिजः दुसरा सामना, पावसाचे सावट, India vs West Indies, 2nd ODI - Preview

भारत वि. वेस्ट इंडिजः भारत सज्ज

भारत वि. वेस्ट इंडिजः भारत सज्ज
www.24taas.com, झी मीडिया, विशाखापट्टणम
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान विशाखापट्टणम इथं आज दुसरी वन-डे रंगणार आहे. पहिली वन-डे जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेतलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वाच चांगलाच दुणावलेला असेल तर विंडिजसमोर कमबॅकच आव्हन असेल. भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून पुन्हा धमाकेदार इनिंगची अपेक्षा फॅन्स बाळगून आहेत. दरम्यान विशाखापट्टण वन-डे पावसाचं सावट असल्याने क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे.

दुस-या विशाखापट्टणम वन-डेमध्ये विजय साकारून सीरिजवर कब्जा करण्याच्या इरा-यानेच टीम इंडिया मैदानात उतरेल. पहिल्या कोचि वन-डेमध्ये विजय साकारून तीन वन-डेच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 1-0ने आघाडी घेतली आहे. यामुळेच आता दुस-या वन-डेमध्येही विजय मिळवण्यासाठी धोनी एँड कंपनी उताविळ असेल. पहिल्या वन-डेमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समन आणि बॉलर्सने आपआपल्या भूमिका उत्तम साकारल्या होत्या. यामुळेच आता दुस-या वन-डेमध्येही टीम इंडिया आपल्या त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाटतेय.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून पुन्हा धमाकेदार बॅटिंगची अपेक्षा आहे. दरम्यान शिखर धवन, युवराज सिंग आणि सुरेश रैनाला कमबॅक कराव लागेल. कांगारूंच्या विरुद्ध पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या भारतीय बॉलर्सना कोचि वन-डेमध्ये सूर गवसला असचं म्हणाव लागेल. भारतीय स्पिनर रवींद्र जाडेजा, आर. अश्विनवरच प्रामुख्याने फिरकीची मदार असणार आहे. तर मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमारवर फास्ट बॉलिंगची जबाबदारी असेल.

पहिल्या वन-डेमध्ये दुखापतग्रस्त झालेला विंडिजचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेल सीरिजमधूनच आऊट झाल्याने विंडिजला चांगलाच धक्का बसला आहे. आता त्यांच्या बॅटिंगची सा-या आशा या डॅरेन ब्राव्हो आणि मार्लन सॅम्यूएल्सवर एकवटलेल्या असतील. स्पिनर सुनिल नारायणलाही पहिल्या वन-डेमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल होत. दरम्यान जेसन होल्डरकडून भारतीय बॅट्समनला सावध रहाव लागेल. टेस्ट सीरिजमध्ये विंडिजला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता वन-डे सीरिज जिंकण्याच्या उंबरठ्यावर टीम इंडिया येऊन ठेपली आहे. आता विशाखापट्टणममध्ये टीम इंडिया विंडिजला कितीने पराभूत करते याकडेच सा-यांच लक्ष लागून राहिल आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 24, 2013, 07:53


comments powered by Disqus