वर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार धोनी ब्रिगेड,India will play test and one d

वर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार धोनी ब्रिगेड

वर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार धोनी ब्रिगेड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गत वर्ल्डकप विजेती टीम इंडिया पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप पूर्वी चार डिसेंबर ते एक फेब्रुवारीपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज आणि तीन वनडे सीरिजमध्ये भाग घेणार आहे. या तीनही सीरिजमध्ये तिसरी टीम इंग्लंड असणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या चार टेस्टच्या सीरिजमधला पहिला सामना हा चार डिसेंबरला ब्रिसेबनमध्ये खेळला जाणार आहे. सीरिजचे बाकीच्या मॅचेस या अॅडिलॅड (१२ ते १६ डिसेंबर), मेलबर्न (२६ से ३० डिसेंबर) आणि सिडनी (३ ते ७ जानेवारी)ला होणार आहेत.

काही दिवसानंतर १६ जानेवारीपासून तीन सीरिज सुरु होईल ज्यांचा शेवटचा सामना पर्थमध्ये १ फेब्रुवारीला होईल.
तर वर्ल्डकप १४ फेब्रुवारीपासून २९ मार्चपर्यंत चालू असतील.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंडने सांगितले की, पुढचे १२ महिने सगळ्यांसाठी काहीना काही नवीन आहे. मागील सत्रांपेक्षा काही नवीन गोष्टी असतील ज्याच्यामुळे खेळांडूना आणि प्रेक्षकांना दोघांना फायदा होईल.

आयसीसी क्रिकेट विश्वकप 2015 चा मुख्य भाग म्हणजे 2014-15 चे कार्यक्रम पहिल्या सत्राच्या तुलनेत खूप वेगळे असणार आहेत. आम्ही 23 वर्षांत पहिल्यांदा या विश्वकप चषकासाठी न्यूझीलँडसोबत सहकारी म्हणून खेळत आहोत, असेही सदरलँडनी सांगितले.

टेस्ट आणि तीन सीरिजचे कार्यक्रम काही अशा प्रकारचे आहेत

> 4 ते 8 डिसेंबर (पहिली टेस्ट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) ब्रिसबेन
> 12 ते 16 डिसेंबर (दूसरी टेस्ट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया), अॅडिलॅड
> 26 ते 30 डिसेंबर (तिसरी टेस्ट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) मेलबर्न
> 3 ते 7 जानेवारी (चौथा टेस्ट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

सिडनी वनडे तीन सीरिज - 16 जानेवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

> 18 जानेवारी- ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड
> 20 जानेवारी- इंग्लंड वि भारत
> 23 जानेवारी- ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड
> 26 जानेवारी-ऑस्ट्रेलिया वि भारत
> 30 जानेवारी- इंग्लंड वि भारत
> पर्थ 1 फेब्रुवारी- फायनल मॅच


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 23, 2014, 17:16


comments powered by Disqus