टी-२० : पहिला सामना भारताने जिंकला India Wins

टी-२० : पहिला सामना भारताने जिंकला

टी-२० : पहिला सामना भारताने जिंकला
www.24taas.com, पुणे

इंग्लंडविरूद्ध टेस्ट सीरिज गमावल्यानंतर धोनी सेनेने भारतीय क्रिकेटप्रेमींना दिलासा दिलाय. पुण्यात झालेल्या पहिल्याच टी-20मध्ये टीम इंडियाने इंग्लंडला 5 विकेट्सने पराभूत केल. या विजयाबरोबरच टीम इंडियाने दोन टी-20 सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतलीय. ऑल राऊंडर कामगिरी करणारा युवराज सिंग 'मॅन ऑफ द मॅच'चा मानकरी ठरला.

इंग्लडविरूद्ध टेस्ट सीरिजमध्ये 1-2 ने पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने टी-20मध्ये कमबॅक केलय. पहिल्याच टी-20मध्ये धोनी सेनेने इंग्लिश सेनेला पराभूत करत दोन टी-20 सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतलीय. युवराज सिंगच्या ऑल राऊंडर कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडवर 5 विकेट्सने विजय मिळवलाय. इंग्लंडच्या 158 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना 18व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर धोनीने दोन रन्स काढत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केल. ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेटसाठी परफेक्ट असलेल्या युवीने प्रथम आपल्या फिरकीची जादू दाखवत तीन विकेट्स घेत इंग्लिश सेनेला धक्के दिले. यानंतर बॅटिंगमध्ये कमाल दाखवत 38 रन्सची धमाकेदार इनिंग खेळली. त्याच्या या ऑल राऊंडर कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅचने गौरवण्यात आल. दरम्यान गंभीर-रहाणेने टीम इंडियाला आक्रमक सुरूवात करून देत 42 रन्सची ओपनिंग दिली. कोहलीने 21, धोनीने नॉट आऊट 26 तर जाडेजाने नॉट आऊट 24 रन्स केल्या.

तत्पूर्वी इंग्लंडने 6 विकेट्स गमावत 157 रन्स केल्या. इंग्लंडची सुरूवात खराब झाली. मात्र, अलेक्स हेल्सने हाफ सेंच्युरी झळकावली. भारताकडून युवीने सर्वाधिक 3, अशोक डिंडीने 2 तर आर. अश्विनने एक विकेट घेतली. पहिल्याच टी-20मध्ये विजय मिळवल्याने निदान आता टी-20 सीरिज तरी धोनी सेना जिंकेल अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमींना वाटतेय.

First Published: Thursday, December 20, 2012, 20:52


comments powered by Disqus