Last Updated: Monday, February 17, 2014, 08:36
www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टनकर्णधार बँडन मॅक्क्युलम आणि विकेट कीपर बीजे वाटलिंगने वेलिंगॉन कसोटीत, लंच ब्रेकपर्यंत भारताला एकही विकेट मिळू दिलेली नाही. वेलिंगटन कसोटीचा आज चौथा दिवस आहे.
न्यूझीलंडने लंच पर्यंत पाच विकेटवर ४०० च्या वर रन्स केल्या आहेत. मॅक्क्युलम डबल सेंचुरी आणि वाटलिंग सेंचुरी करून क्रीजवर आहे.
न्यूझीलंड टीमची आघाडी आता १०० धावांच्या वर गेली आहे. भारताला ही कसोटी मालिका बरोबरीत सोडवायची असेल, तर ही जोडी फोडणे महत्वाचे आहे.
न्यूझीलंडने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाच विकेट गमावल्या होत्या, मात्र मॅक्क्युलम आणि वाटलिंगने सहाव्या विकेटपर्यंत भागीदारी करत 253 धावा केल्या.
भारताविरोधात न्यूझीलंडकडून ही सहाव्या विकेटपर्यंतची सर्वात मोठी पार्टनरशीप आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 17, 2014, 08:36