आयपीएल-७ साठी ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर Indian Premier League 2014: Sehwag, Yuvraj among 11 Indian

आयपीएल-७ साठी ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर

आयपीएल-७ साठी ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयपीएलचा नवा सीझन जसा जवळ येऊ लागला, तशी या सीझनसाठी होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या लिलावाची चर्चादेखील आता जोर धरू लागली आहे. यंदा सर्वाधिक क्रिकेटपटू लिलावात उतरणार असून, संभाव्यपणे सर्वांत महागड्या ठरणाऱ्या ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आली.

लिलावात या क्रिकेटपटूंना अव्वल श्रेणीत गणलं जाणार असून, त्यांच्यासाठी तब्बल दोन कोटी इतकी किंमत फ्रॅंचायजींना मोजावी लागेल. या अव्वल श्रेणीसाठी सर्वाधिक पसंती अॅशेस मालिका गाजवणाऱ्या मिचेल जॉन्सन, ब्रॅड हॅडिन आणि स्टीव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियन्सना मिळाली आहे.

त्याचबरोबर भारतीय टीममधील स्थान गमावणाऱ्या युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, दिनेश कार्तिक आणि युसूफ पठाण यांनादेखील या गटात समावेश करण्यात आलंय.

कोण आहेत हे खेळाडू

दिनेश कार्तिक, प्रवीण कुमार, अमित मिश्रा, आशिष नेहरा, प्रग्यान ओझा, युसुफ पठाण, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा, मुरली विजय, जॉर्ज बेली, ब्रॅड हेडिन, ब्रॅड हॉग, मायकल हसी, मायकल जॉन्सन, ब्रेट ली, शॉन मार्श, जेम्स पॅटिन्सन, स्टिव्हन स्मीथ, मायकेल स्टार्क, अॅलेक्स हेल्स, समीत पटेल, केविन पिटरसन, ब्रेंडन मॅक्कलम, रॉस टेलर, जॅक कॅलिस, तिलकरत्न दिलशान, महेला जयवर्धने, अँजेलो मॅथ्यूज आणि मार्लोन सॅम्युअल


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 30, 2014, 19:31


comments powered by Disqus