Last Updated: Thursday, February 13, 2014, 19:35
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली इंडियन प्रीमियर लीगचा सातवा सीझन देशाबाहेर होण्याची शक्यता आहे. सातव्या मोसमातील स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होऊ शकते.
`आयपीएल`चे अध्यक्ष राजीव बिस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या सातवा मोसमातील स्पर्धेसाठी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे.
भारतातच हे सामने भरविण्यासाठी राजीव बिस्वाल उत्सूक आहेत. देशातील `आयपीएल`च्या चाहत्यांचीही तशीच अपेक्षा आहे. भारतात जास्तीत जास्त सामने खेळवता येतील, असाच आयोजन समितीचा प्राधान्यक्रम राहील. मात्र देशातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयोजन इतर ठिकाणी करावे लागेल.
भारतात जर आयपीएल-७ झाले नाही तर आयपीएल-७ दक्षिण आफ्रिकात घेण्यात येणार आहे. मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येत्या दहा दिवसात आयपीएलच्या आयोजन स्थळाचा प्रश्न निकाली निघायला हवा आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 13, 2014, 19:35