धोनीचे प्रयत्न अयशस्वी; संतोषचा मृत्यू, Inventor of MS Dhoni`s helicoptor shot dies

धोनीचे प्रयत्न अयशस्वी; संतोषचा मृत्यू

धोनीचे प्रयत्न अयशस्वी; संतोषचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

झारखंडचा रणजी क्रिकेटपटू आणि महेंद्र सिंग धोनीचा जवळचा मित्र संतोष लाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

स्वादूपिंडाला इन्फेक्शन झाल्यानंतर संतोषला बेशुद्ध अवस्थेत मंगळवारी तातडीनं दिल्लीच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथंच त्यांच्यावर उपचार सुरू होते. या इलाजासाठी येणारा संपूर्ण खर्च धोनीनं उचलायची तयारी दर्शवली होती. परंतू डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे पडले आणि संतोष लाल यांचा अखेरचा श्वास घेतला.

धोनीचा लोकप्रिय ‘हेलिकॉप्टर शॉट’ त्याला संतोषनंच शिकवला होता. या दोघांनी झारखंडकडून एकत्र काही रणजी मॅचही खेळल्या होत्या. काही दिवस हे दोघे एकत्रच शिक्षणही घेत होते. लाल हे रेल्वेमध्ये नोकरी करत होते. धोनी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. तिथूनच त्यानं लाल यांना मदत करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 17, 2013, 11:02


comments powered by Disqus