आयपीएल २०१४ मधील या खेळाडूंचा लिलाव नाही!, IPL 2014 Auction of players in this!

आयपीएल २०१४ मधील या खेळाडूंचा लिलाव नाही!

आयपीएल २०१४ मधील या खेळाडूंचा लिलाव नाही!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयपीएलच्या२०१४ मधील ७ व्या सिजनसाठी अनेक खेळाडूंचा लिलाव होणार आहे. कोणत्या खेळाडूंचा लिलाव होणार नाही, याची यादी देण्याची तारीख १० जानेवारी होती. त्यानुसार या खेळाडूंचा आता लिलाव होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी सर्व टीमने आपल्या खेळाडूंची यादी दिलेय. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्सने महेंद्रसिंग धोनी सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर अश्विन, ड्वेन ब्रावो यांचा आता लिलाव होणार नाही. तर दिल्ली डेयरडेविल्स या संघाने कोणत्याही खेळाडूचा लिलाव न करण्याचा निर्णय घेतलाय.

किंग्स इलेव्हन पंजाबमधील डेविड मिलर, मनन वोहरा यांचा लिलाव होणार नाही. कोलकाता नाइट राइडर्समधील गौतम गंभीर, सुनील नरेन, मुंबई इंडिन्यसमधील रोहित शर्मा, लसिथ मलिंगा, किरोन पोलार्ड, हरभजन सिंह, अंबाती रायडू तर राजस्थान रॉयल्समधील शेन वाटसन, जेम्स फॉकनर, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी तसेच रॉयल चैलेंजर्स बेंगलोरमधील विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिविलियर्स तर सनराइजर्स हैदराबादमधील शिखर धवन, डेल स्टेन या खेळाडूंचा लिलाव होणार नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 11, 2014, 17:59


comments powered by Disqus