आयपीएल : चेन्नईची मुंबईवर 7 विकेटसे मात IPL 2014: Chennai Super Kings Eliminate Mumbai Indians, Will

आयपीएल : चेन्नईची मुंबईवर 7 विकेटसे मात

आयपीएल : चेन्नईची मुंबईवर 7 विकेटसे मात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

चेन्नई सुपर किंग्सने एलिमिनेटर सामन्यामध्ये मुंबईवर 7 विकेट्स राखून मात केलीय. यामुळे आयपीएल सेव्हनमध्ये गतवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलंय.

हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला. या एलिमिनेटर सामन्यामध्ये सुपर किंग्ससमोर विजयासाठी 174 धावांचं लक्ष्य मुंबई इंडियन्सने ठेवलं होतं.

या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या सुरेश रैनानं नाबाद अर्धशतक ठोकलं, आणि डेव्हिड हसीनं नाबाद 40 रन्स केल्याने, चेन्नईनं 20 षटकांत 3 बाद 176 वर मजल मारली.

या आधी झालेल्या डावात मुंबईसाठी लेण्डल सिमॉन्सनं 67 धावा केल्या. त्यामुळे मुंबईने 20 षटकांत 8 बाद, 173 धावा केल्या. मात्र चेन्नईनं 20 षटकांत 3 बाद 176 वर मजल मारली.

फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला सामोरं जावं लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 29, 2014, 08:07


comments powered by Disqus