मुंबई गुणतक्त्यात अव्वल, जयपूरही करणार फत्ते?, ipl 6: mumbai indians vs rajasthan royals

मुंबई गुणतक्त्यात अव्वल, जयपूरही करणार फत्ते?

मुंबई गुणतक्त्यात अव्वल, जयपूरही करणार फत्ते?
www.24taas.com, जयपूर

मुंबई इंडियन्स समोर जिगरबाज राहुल द्रविड आणि सहकाऱ्यांचे कडवे आव्हान असणार आहे. मात्र, मुंबईतील घरच्या मैदानावर विजय मिळविलेल्या मुंबई इंडियन्य आज जयपूर फत्ते करण्यास सज्ज आहे. तर मुंबई गुणतक्त्यात अव्वल आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स रॉयल विजय मिळवेल, अशी शक्यता आहे.

मुंबई इंडियन्स आपल्या रॉयल विजयांची मालिका राजस्थानविरुद्धही कायम राखण्याचा मुंबईचा इरादा आहे. असे असले तरी तगड्या राहुल द्रविड सेनेचे आव्हान असणार आहे. राजस्थानला घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा नक्कीच मिळू शकेल. येथील वातावरणही त्यांच्या खेळास पोषक आहे.

प्रत्येक सामन्यागणिक कामगिरी कमालीची उंचावत असलेल्या मुंबईला रोखण्यासाठी राहुल द्रविड सेनेनेला मोठे प्रयत्न करावे लागतील. मात्र, ते कितपत उपयोगी पडेल हाच प्रश्न आहे. मुंबई तसेच राजस्थानने आतापर्यंत प्रत्येकी तीन लढती जिंकल्या आहेत. मात्र, सरस निव्वळ धावगतीमुळे मुंबई गुणतक्त्यात अव्वल आहेत. मुंबई इंडियन्स टिममध्ये अनेक स्टार खेळाडू असूनही अजून एकदाही मुंबईने ही स्पर्धा जिंकलेली नाही.

First Published: Wednesday, April 17, 2013, 16:30


comments powered by Disqus