Last Updated: Monday, May 5, 2014, 14:38
www.24taas.com, झी मीडियारॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एबी डिविलियर्सच्या खेळीवर हैदराबाद सनरायझर्सकडून विजय खेचून आणला आहे. यामुळे रॉयल चॅलेंजर्सचा पराभवाचा सिलसिला थांबला आहे.
डिविलियर्सने 41 चेंडूत 89 धावा केल्या. डिविलियर्सने विजयी चौकार लगावून कर्णधार विराट कोहलीला विजयांचा आनंद मिळवून दिला.
डिविलियर्स नावाच्या वादळाने सनरायझर्सचा विजय खेचून आणला.
आरसीबी टीम पराभवाच्या छायेत होती, मात्र आरसीबीने हा सामना चार विकेटने जिंकला. हैदराबादच्या 156 धावांचा पाठलाग करतांना, आरसीबीची टीम 15 व्या षटकात, पाच बाद 95 धावांवर होती.
मात्र डिविलियर्स मिशेल स्टार्कसोबत 4.4 षटकांत 57 धावांची भागीदारी करून आपल्या टीमला विजय मिळवून दिला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 5, 2014, 14:38