मुंबईची पुन्हा हार, आयपीएलमधील आव्हान संपुष्टात!, IPL 7 SCORE: Kolkata Knight Riders vs Mumbai India

मुंबईची पुन्हा हार, आयपीएलमधील आव्हान संपुष्टात!

मुंबईची पुन्हा हार, आयपीएलमधील आव्हान संपुष्टात!
www.24taas.com, झी मीडिया, कडट

रॉबिन उथप्पाने आपला इंगा दाखवून दिल्याने मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का बसला. उथप्पाच्या खेळीने कोलकाता नाइट रायडर्सला विजय साजरा करता आला.

उथप्पाने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 52 बॉल्समध्ये 80 रन्स ठोकल्या. यामध्ये 9 फोर आणि 1 सिक्स हाणला. या खेळीच्या जोरावर कोलकाताने मुंबई इंडियन्सचा सहा विकेट आणि 8 बॉल्स राखून पराभव केला. त्यामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आयपीएलच्या सातव्या मोसमातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

पराभवाचे नैराश्य मुंबई संघातील खेळाडू लपवू शकले नाहीत. 10 सामन्यांपैकी सात पराभव पत्करणारा हा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने 5 विकेट 141 रन्स केल्यात. रोहितने 45 बॉल्समध्ये 51 रन्स तडकावल्यात. अर्धशतकी खेळी साकारताना दोन सिक्स आणि चार फोर ठोकले. अंबाती रायुडूने 27 बॉल्समध्ये तीन फोर व एका सिक्स मारत 33 रन्स केल्या.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 15, 2014, 08:05


comments powered by Disqus