Last Updated: Thursday, January 30, 2014, 00:48
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईएकेकाळी सलामीचा फलंदाज असलेला वीरेन्द्र सेहवाग खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याला भारतीय टीममध्ये जागा मिळालेली नाही, मात्र सेहवागला आयपीएल लिलावात दोन कोटींची किंमत लाभली आहे.
सेहवाग मागील वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेला नाही. आयपीएलमध्येही सेहवागची कामगिरी एवढी चांगली राहिलेली नाही.
म्हणून दिल्ली डेअरडेव्हिल्सने सेहवागला लिलावात काढलं, आणि 12 फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएल लिलावात सेहवागसाठी 2 कोटी रुपयांची मूळ किंमत ठरवण्यात आली.
लिलावात एकूण 46 भारतीय आणि 187 परदेशी क्रिकेटर्सवर बोली लागणार आहे.
इरफान आणि ईशांतसाठी दीड कोटी रुपयांची मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे. तर सहवागबरोबरच युवराज सिंग आणि युसूफ पठाणसाठी दोन कोटी रुपयांची किंमत ठरवण्यात आली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 30, 2014, 00:48