Last Updated: Sunday, April 20, 2014, 19:32
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तपासासाठी नवी चौकशी समितीची नावं बीसीसीआयनं सुचवलीय. बीसीसीआयनं यासाठी तीन नावं सुचवलीत. यात रवी शास्त्री, माजी सीबीआय प्रमुख राघवन आणि जस्टिस पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार आहे.
मुदगल समितीच्या अहवालानुसार ही नवी चौकशी समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बोर्डानं ही नवी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयनं आज तातडीची बैठक बोलवली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं या नव्या चौकशीतून आता स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कोणती नावं समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सध्या तरी बीसीसीआयमध्ये श्रीनिवासन यांच्या भवितव्याबाबत दोन गट पडल्याचं चित्र आहे. श्रीनिवासन यांच्याविरोधातला गट या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशीच्या बाजुनं आहे. तर एक गट श्रीनिवासन यांच्या बाजुनं असल्याची माहिती मिळतेय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 20, 2014, 19:15