आयपीएलचा सामना उधळण्याची धमकी, ipl,pune, subrata roy sahara stadium

आयपीएलचा सामना उधळण्याची धमकी

आयपीएलचा सामना उधळण्याची धमकी
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

आयपीएल-६ची रंगत आता वाढीला लागेल. असे असताना आयपीएलचा सामना होऊ देणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्य़ातील ९ मे रोजी होणारा आयपीएलचा सामना उधळण्याची धमकी छावा संघटनेनं दिलीये.

पुण्याजवळच्या सुब्रतो राय सहारा स्टेडियमचं नाव बदलून स्टेडियमला प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव द्यावं अशी संघटनेची मागणी आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिअशनचे हे स्टेडिअम पुण्याजवळच्या गहुंजे इथे आहे. नाव बदलण्याचा निर्णय न झाल्यास, ९ मेला होणारा आयपीएलचा सामना उधळला जाईल, असा इशारा संघटनेनं दिलाय.

तसंच, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर देखील बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या मागणीसाठी महिनाभरापासून सर्व संबंधित व्यक्ती आणि संघटना यांच्याशी पत्र व्यवहार केला असून काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं, आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचं छावा संघटनेचं म्हणणं आहे.

First Published: Monday, May 6, 2013, 15:06


comments powered by Disqus