Last Updated: Sunday, February 10, 2013, 12:18
www.24taas.com, मुंबईइराणी करंडक सामन्यात शेष भारत संघाने चौथ्या दिवसअखेर, मुंबईवर ४१३ रन्सची भक्कम आघाडी घेतली आहे. दिवसअखेर ४ बाद २९६ रन्स केल्या.
शेष भारताच्या अंबाती रायडूचं नाबाद शतक हे दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. रायुडूने २१७ चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि चार षटकारांची बरसात करत नाबाद १८८ रन्स केल्या. तर दिवस संपेपर्यंत सुरेश रैनानेही ४० रन्सची खेळी केली.
शेष भारताने तिसऱ्या दिवशीच्या एक बाद २७ या धावसंख्येवरून पुढे डाव सुरू करताना श्रीशांत आणि मुरली विजयच्या रुपाने आणखी दोन विकेट्स लवकर गमावल्या. पण त्यानंतर मनोज तिवारी आणि अंबाती रायुडूने संघाचा डाव सावरला. तिवारी १६६ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ६९ रन्स करून आऊट झाला तर अंबाती रायुडूने नाबाद शतक ठोकलं.
मुंबईकडून शार्दुल ठाकूर, धवल कुलकर्णी, आणि विशाल दाभोळकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पण शेष भारताच्या मजबूत स्थितीमुळे, इराणी करंडक पटकावण्याचं मुंबईचं स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे.
First Published: Sunday, February 10, 2013, 12:12