ऑलराऊंडर जॅक कॅलिस होणार निवृत्त…, Jacques Kallis to retire after Durban Test

ऑलराऊंडर जॅक कॅलिस होणार निवृत्त…

ऑलराऊंडर जॅक कॅलिस होणार निवृत्त…
www.24taas.com, झी मीडिया, डर्बन

दक्षिण आफ्रिकन ऑलराऊंडर क्रिकेटर जॅक कॅलिसने भारताविरूद्ध होणाऱ्या डर्बन टेस्टनंतर आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

३८ वर्षीय कॅलिसनं ‘ट्विटर’ या सोशल नेटवर्किंग साईटवर रिटारयमेंट घेणार असल्याचं जाहीर केलंय. ‘२०१५ वन-डे वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकचं प्रतिनिधित्व करता यावं याकरता टेस्ट क्रिकेटला अलविदा केल्याचं’ त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

१४ डिसेंबर १९९५ रोजी जॅकनं आपल्या करिअरमधली पहिली टेस्ट मॅच इंग्लंडविरुद्ध खेळली होती. जॅक कॅलिसने १६५ टेस्टमध्ये १३ हजार १७४ रन्स करताना ४४ सेंच्युरीसह ५८ हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. कॅलिसची टेस्ट करिअरची अखेरची मॅच २६ डिसेंबरपासून डर्बन इथं रंगतेय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 25, 2013, 17:06


comments powered by Disqus