कॅलिस आणि स्टेन फिट, रंगणार चांगलीच चुरस!, Kallis and Steyn fit, played cangalica curasa!

कॅलिस आणि स्टेन फिट, रंगणार चांगलीच चुरस!

कॅलिस आणि स्टेन फिट, रंगणार चांगलीच चुरस!
www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग

जागतिक एकदिवसीय सामन्याच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा जलदगतीचा गोलंदाज ‘डेल स्टेन’ आणि अष्टपैलू खेळाडू ‘जॅक कॅलिस’ ह्या अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूंची प्रकृती आता तंदुरुस्त आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी या दोघांनाही किरकोळ दुखापती झाली होती. त्यामुळं त्यांना पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळता आली नव्हती. पण आता ते भारताविरुद्ध गुरूवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे.

भारताविरूद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय मालिका गुरूवारपासून खेळण्यास सुरूवात करणार आहे. मालिकेपूर्वी त्यांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या, परंतू आता त्यांची तब्येत तंदुरूस्त आहे. त्यामुळं गुरूवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेत ते सहभागी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात आलं की, भारताविरूद्धची ही मालिका फार महत्त्वाची असून त्यात चांगल्या कामगिरीची गरज आहे. नुकतंच झालेल्या पाकविरूद्धच्या मालिकेत या दोन्ही खेळाडूंना फारकत करावी लागली. त्यामुळं या मालिकेकडं सर्वाचं लक्ष लागलंय. तसंच भारतानं या आधी सलग सहा सामने जिंकले आहेच. त्यामुळं ही मालिका आमच्यासाठी आव्हान असणार आहे, असंही दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजांनी म्हटलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 4, 2013, 17:05


comments powered by Disqus