`कमला`ने तारूनही `डेक्कन` डिस्चार्ज`kamla` was replaced by `Deccan` discharge

`कमला`ने तारूनही `डेक्कन` डिस्चार्ज

`कमला`ने तारूनही `डेक्कन` डिस्चार्ज
www.24taas.com

आयपीएलमधील एक टीम असलेल्या डेक्कन चार्जर्सने आपली टीम, मुंबईस्थित कमला लँडमार्क रियल इस्टेट होल्डिंग्स या कंपनीला विकत दिली आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या इंडियन प्रिमियर लीगच्या डेक्कन चार्जर्स फ्रेंचायजीने संघाचे मालकी हक्क मुंबईच्या कमला लॅण्डमार्क रिअल इस्टेट होल्डींग लिमिटेडला विकण्याचा निर्णय घेतला आहे. चार्जर्सची मूळ मालकी असणा-या डेक्कन क्रोनिकल्स होल्डीगसने या निर्णयाची माहिती दिली.

मुंबई स्थित रियल इस्टेट कंपनीने डेक्कन चार्जर्स ही टीम विकत घेतलेली आहे. तरीही किती रक्कमेला हा खरेदी व्यवहार झाला त्याबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. डीसीएचएल संचालक मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत विक्रीचा निर्णय घेण्यात आला. डीसीएचएलने बोर्डाला मालकी हक्क विकण्याचे अधिकार दिले होते.

डीसीएचएलने मुंबई शेअर बाजाराला या निर्णयाची माहिती दिली आहे. या घोषणेनंतर डीसीएचएलचा शेअर ४.९२ टक्क्यांनी वधारला. आर्थिक अडचणींमुळे संघ चालवणे परवडत नसल्याने डेक्कन लिमिटेडने बीसीसीआयकडून परवानगी घेऊन संघ विकण्याचा निर्णय घेतला. डेक्कन चार्जर्सचे मालक असलेल्या डेक्कन क्रोनिकल होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

ऑक्टोबर ९ ला मुंबई उच्च न्यायालयाने डेक्कन क्रोनिकल्स होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीला १०० करोड रुपये इतकी विनाअट बँक गॅरँटी बीसीसीआयला ३ दिवसांच्या शेवटच्या मुदतीवर भरण्यास सांगितली होती.

First Published: Saturday, October 13, 2012, 15:59


comments powered by Disqus