कसाब, हल्ला आणि इंग्लंड टीम, Kasab, Attack and England team

कसाब, हल्ला आणि इंग्लंड टीम

कसाब, हल्ला आणि इंग्लंड टीम
www.24taas.com,मुंबई

मुंबईवर कसाबने हल्ला केला आणि पुण्यात फाशी दिली त्यावेळी क्रिकेटमध्ये योगायोग जुळून आलाय. नक्की काय झालं, असा प्रश्न साहजिकच आहे. मात्र, हल्ल्याच्यावेळी इंग्लंड टीम भारतीय दौऱ्यावर होती. तर फाशीच्यावेळीही इंग्लंड टीम भारतात आहे.

तब्बल चार वर्षांनंतर क्रूरकर्मा कसाबला पुण्यात फाशी देण्यात आली. कसाबनं चार वर्षापूर्वी मुंबईवर हल्ला केला तेव्हा भारत आणि इंग्लंडमध्ये वनडे सीरिज सुरु होती...आणि तब्बल चार वर्षानंतर कसाबला फाशी देण्यात आली तेव्हाही इंग्लिश क्रिकेट टीम भारतीय दौ-यावर आहे. हा योगायोग चर्चेचा विषय ठरला आहे. क्रिकेटमध्ये असेही होऊ शकते, याची झलक पाहायला मिळाली आहे.

२००८ ध्ये भारत दौ-यावर आलेल्या इंग्लिश टीम पाचवी वनडे कटकला खेळत असताना कसाब आणि त्याच्या सहका-यांनी मुंबईवर हल्ला केला होता.

First Published: Thursday, November 22, 2012, 11:10


comments powered by Disqus