रंगतदार लढतीत कोलकाता नाईट रायडर्स विजयी, Kolkata Knight Raiders win

रंगतदार लढतीत कोलकाता नाईट रायडर्स विजयी

रंगतदार लढतीत कोलकाता नाईट रायडर्स विजयी
www.24taas.com, झी मीडिया, शारजा

आयपीएलमध्ये खरा सामना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलपर्यंत सामना खिळून होता. अखेरच्या बॉलवर विजय खेचून आणून तो साजरा केला तो नाईट रायडर्सने. रंगतदार ठरलेल्या लढतीत कोलकता नाईट रायडर्सने गुरुवारी रॉयल चॅलेंर्जस बेंगळुरू संघाचा दोन रन्सने पराभव केला. हा कोलतात्याचा दुसरा विजय आहे.

कोलकताने 7 बाद 150 रन्सचे टार्गेट पार केले तेही शेवटच्या बॉलवर. बंगळुरू संघाचा डाव 5 बाद 148 रन्सवर आटोपला. बंगळुरूकडून खेळताना योगेश ताकवाले (40), कर्णधार विराट कोहली (31), पार्थिव पटेल (21) आणि युवराजसिंग (31) यांनी चांगला खेळ केला. परंतु त्यांनी मोठी धावसंख्या उभारता आली आही.

रॉयल चॅलेंर्जसला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ९ रन्सची गरज होती, पण विनय कुमारने केवळ 6 रन्स दिल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करणारा विनय कुमार आणि अफलातून झेल टिपणारा ख्रिस लिन नाईट रायडर्सच्या विजयाचा शिल्पकार ठरले.

सुनील नरिनने एक बळी घेत पर्पल कॅपचा मानकरी झाला. त्याआधी, वरुन अँरोनच्या (3-16) अचूक मार्‍याच्या जोरावर रॉयल चॅलेंर्जस बंगळुरू संघाने कोलकता नाईट रायडर्सचा डाव माफक धावसंख्येत रोखला. निराशाजनक सुरुवातीनंतर जॅक कॅलिस (43 रन्स, 42 बॉल) आणि क्रिस लिन (45 रन्स, 31बॉल) यांनी तिसर्‍या विकेटसाठी 80 रन्सची भागीदारी करीत कोलकता संघाचा डाव सावरला, पण त्यानंतर अँरोनच्या मार्‍यापुढे कोलकताचा डाव गडगडला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 25, 2014, 09:24


comments powered by Disqus