ललित मोदींच्या लग्नाची कहाणी LALIT MODI`S MARRIAGE STORY

ललित मोदींच्या लग्नाची कहाणी

ललित मोदींच्या लग्नाची कहाणी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

क्रिकेट जगतात आणि `आईपीएल`मध्ये वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित मोदींच आयुष्य देखिल तितकचं वादळी राहिलेलं आहे. मोदी हे सहजासहजी कुठेच हार मानत नाहीत.

`आईपीएल` मधून `बीसीसीआय`ने गच्छंती केल्यानंतर देखिल, राजस्थान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाची माळ मोदींनी आपल्याच गळ्यात घालून घेतली होती. या वरूनच मोदींची जिद्द दिसून येते. अशीच एक प्रकारची जिद्द ललित मोदींनी आपली लाईफ पार्टनर मिळवण्यात देखील केल्याचे दिसते.

मिनल आणि ललित मोदींनी 17 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न केले. पण मोदींच्या लग्नाचा इतिहास तसा एका सिनेमाच्या कहाणीला शोभेल असाच आहे. मोदींची पत्नी ही त्यांच्यापेक्षा 9 वर्षानी मोठी आहे. मिनल ही खरं तर मोदींच्या आईची मैत्रीण होती.

ललित मोदींनी मिनलला तिच्या लग्नाच्या काही दिवसा अगोदरच प्रपोज केलं होत. या प्रकाराने मिनल संतापली होती. तीने नायजेरियाचा उद्योजक जॅक सागरानी यांच्यासोबत लग्न केले. हे लग्न चार वर्ष टिकलं. या चार वर्षात मिनलने ललित मोदींशी संबंध तोडले होते.

पण घटस्फोट झाल्यावर ललित आणि मीनल पुन्हा जवळ आले. त्यांच्या या नात्याला आधी घरच्यांनी विरोध केला. पण नंतर मोदींच्या हट्टापायी घरच्यांनी ललित आणि मिनल यांचं लग्न लावून, मिनलचं मोदी कु़टुंबात स्वागत केलं. आज मोदींना रुचीर नावाचा मुलगा आणि आलिया नावाची मुलगीही आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 14:31


comments powered by Disqus