सचिनपेक्षा लाराच श्रेष्ठ; पाकचे फुत्कार , LARA IS BEST CRICKETER THAN SACHIN, SAYS SHAHID AFRIDI

सचिनपेक्षा लाराच श्रेष्ठ; पाकचे फुत्कार

सचिनपेक्षा लाराच श्रेष्ठ; पाकचे फुत्कार
www.24taas.com, झी मीडिया, कराची

क्रिकेट जगतात कोण श्रेष्ठ… सचिन की लारा? हा विषय तितका महत्त्वाचा नसला तरी याच विषयावर वादग्रस्त विधान करून क्रिकेटप्रेमींमध्ये तेढ निर्माण करण्याची शर्यतच लागलीय. याच वादात आता पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनंही उडी मारलीय.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग या दोघांपेक्षा वेस्ट इंडिजचा ब्रायन लाराच श्रेष्ठ असल्याचं मत पाकच्या आफ्रिदीनं व्यक्त केलंय.

‘सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉंटिंग यांच्या तुलनेत ब्रायन लारा मला श्रेष्ठ वाटतो. माझ्या गेल्या १६ वर्षांच्या करिअरमध्ये मी बघितलेल्या फलंदाजांपैकी लारा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. मी गोलंदाजी केलेल्या फलंदाजांपैकी लाराला गोलंदाजी करताना मला दडपण येत होतं. मी केलेल्या गोलंदाजीवर लारा सहज खेळू शकतो. फिरकी गोलंदाजांना तोंड देताना लाराची फलंदाजी बघण्यासारखी असते’ असं आफ्रिदीनं म्हटलंय. सोबतच ‘ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ आणि पाकिस्तानचा नवीन गोलंदाज महंमद आरिफ चांगले गोलंदाज असल्याचे मला वाटतं’ असंही आफ्रिदीनं म्हटलंय.

पाकिस्तान क्रिकेट संघात आपलं नक्कीच पुनरागमन होईल, असा आशावाद शाहीद आफ्रिदीनं पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

…तेव्हा सचिन थरथरत होता
याअगोदरही, `शोएबची गोलंदाजी खेळताना सचिनचे पाय कापत असल्याचं मी फिल्डिंग करताना पाहिलंय, पाकिस्तानचा ऑफ स्पिनर सईद अजमलचे चेंडू खेळतानाही सचिनची हीच परिस्थिती होती` असा दावा आफ्रिदीनं केला होता. यामुळे सर्वच स्थरांतून झालेल्या टीकेमुळे त्याला माफीनामा सादर करावा लागला होता. त्यानंतर सचिनविषयी आपल्याला आदर असल्याचंही त्यानं म्हटलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, August 9, 2013, 19:08


comments powered by Disqus