महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं, कर्नाटककडून पराभूत, Maharashtra dream incomplete, beat Karnataka

महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं, कर्नाटककडून पराभूत

महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं, कर्नाटककडून पराभूत
www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद

रणजी करंडक जिंकण्याचं महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं आहे. २१ वर्षांनंतर आलेली संधी महाराष्ट्र संघाने दवडली. कर्नाटककडून महाराष्ट्र ७ विकेट्सनी पराभूत झाला.

महाराष्ट्रावर ७ विकेट्सनी मात करत कर्नाटकनं रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या पराभवासह महाराष्ट्राचं २१ वर्षांनी रणजी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. तर कर्नाटकनं सातव्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली.

कर्नाटकनं याआधी १९९८-९९ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. तर २००९-१० मध्ये मुंबईकडून त्यांना फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तत्पूर्वी, महाराष्ट्रची टीम दुस-या इनिंगमध्ये ३६६ रन्सवरच ऑल आऊट झाली. केदार जाधवच्या ११२ रन्सच्या जोरावरच महाराष्ट्राला साडेतीनशेहून अधिक रन्स करता आल्या.

महाराष्ट्रानं कर्नाटकसमोर विजयासाठी १५७ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. कर्नाटकनं हे आव्हान ३ विकेट्स गमावूनच पार केलं. चिराग खुरानानं सिक्स मारत आपल्या टीमला विजश्री मिळवून दिली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 2, 2014, 19:09


comments powered by Disqus