Last Updated: Wednesday, March 19, 2014, 14:30
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्लीटीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा कित्ता गिरवलाय. नेटमध्ये सराव करताना अमित मिश्राचा गोलंदाजीवर ‘हल्लाबोल’ केलाय. त्यांने सहा सिक्स आणि चार फोर लगावलेत.
नेटमध्ये सराव करताना धोनीने लेगस्पिनर अमित मिश्राने टाकलेल्या १० चेंडूंवर घणाघात हल्ला चढवताना सहा सिक्स आणि चार फोर चोपून काढले. रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा यांच्यासमोर अमित ‘काहीच’ नसल्याचे दाखवून देण्याचा हा बेत नाही ना, अशी शंका उपस्थित झाली.
असाच प्रश्न काही वर्षांपूर्वी सौरभ गांगुलीच्या काहीशा अशाच वृत्तीमुळे मुरली कार्तिकची कारकीर्द लांबली नाही. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग संघात असल्यामुळे गांगुलीला कार्तिक संघात नको होता. त्यामुळे नेटमध्ये सराव करताना गांगुली त्याच्या गोलंदाजीवर ‘हल्लाबोल’ करायचा. त्यामुळे कार्तिकची टीम इंडियातील स्थान लांबले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 19, 2014, 14:30