Last Updated: Sunday, January 19, 2014, 21:06
www.24taas.com, झी मीडिया, नेपियर महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झालेला आहे. विकेटकिपर असतांना ३०० बळी घेणारा महेंद्रसिंह धोनी पहिलाचा भारतीय खेळाडू ठरलाय, जगात मात्र महेंद्रसिंह धोनी चौथ्या क्रमांकावर आहे.
नेपीयरयेथील न्यूझीलंडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रॉस टेलरचा झेल घेतला आणि धोनीने आपली तीनशेवी विकेट साजरी केली.
धोनीने २३९ सामन्यात हा विक्रम केला आहे. धोनीने आज रॉस टेलरनंतर त्याने ब्रँडन मॅक्यूलमचा झेल घेत ३०१ विकेट्स घेतल्या आहेत. ह्या कामगीरीसाठी धोनीने २२१ झेल घेतले आहेत, तर ७९ खेळाडूंना यष्टीचीत केलं आहे.
यष्टीरक्षक म्हणून वनडेत सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड अडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे. यष्टीरक्षक म्हणून गिलख्रिस्टने ४७२ विकेट घेतल्या आहेत. तर ४४३ बळी घेऊन कुमार संघकारा दुसऱ्या स्थानावर, आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर ४२५ बळी घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 19, 2014, 18:43