धोनीने दिली पहिल्या प्रेमाची कबुली, Mahendra Singh Dhoni`S First Love

धोनीने दिली पहिल्या प्रेमाची कबुली

धोनीने दिली पहिल्या प्रेमाची कबुली
www.24taas.com झी मीडिया, रांची

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या पहिला प्रेमाची कबुली पत्नी साक्षीलाच दिली. धोनी ही कबुली ऐकून साक्षीने एक स्मित हास्य केलं. साक्षीनेही कोणताही राग व्यक्त न करता त्याच्या पहिल्या प्रेमाला दाद दिली. धोनी आपले प्रेम चाहत्यांसाठी जाहीरही करणार आहे.

टीम इंडियाचा कूल कॅप्टन धोनी नेहमीच चर्चेत राहतो. पण ही चर्चा चांगल्या कारणासाठी आहे. धोनीला प्राण्यांविषयी खूप आपुलकी आहे. ते त्यांने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांने आधी वाघ दत्तक घेतला होता. आता तर भटके जखमी कुत्र्याचे पिल्लू (पपी) दत्तक घेतलेय. आता माहीने रांची येथील प्राणी संग्राहलयातून घेतलेल्या कुत्राचे नाव ‘लिया’ असे ठेवले आहे. माही त्याला इंग्रजीत ‘ली’ तर हिदींत ‘लिया’ अशी हाक मारणार आहे. आता तर धोनीने प्रेमाची कबुली का दिली, हे त्याच्याकडूनच जाणून घेऊया.

माझी पहिला बाईक मला प्राणप्रिय आहे. मी तिच्यावर जीवापाढ प्रेम केलं आहे. ते माझं पहिलं वहिलं प्रेम आहे. ४,५०० रूपयांत खरेदी केलेली माझी पहिली बाईल मला प्रिय आहे. ती अतिशय खराब अवस्थेत आहे. तिच्यात सुधारणा करणार आहे. आणि त्या बाईचा फोटो मी माझ्या लाखो चाहत्यांसाठी अपलोड करणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 17, 2013, 15:36


comments powered by Disqus