पाकला धूळ चारत श्रीलंकेनं जिंकला आशिया कप,Malinga, Thirimanne guide Sri Lanka to 5th Asia Cup trophy

पाकला धूळ चारत श्रीलंकेनं जिंकला आशिया कप

पाकला धूळ चारत श्रीलंकेनं जिंकला आशिया कप
www.24taas.com, झी मीडिया, मीरपूर

लाहिरु थिरिमन्नेच्या दमदार सेंच्युरीच्या जोरावर श्रीलंकेनं पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात करत आशिया चषकावर आपलं नाव कोरलंय. मिरपूरच्या या सामन्यात पाकिस्ताननं श्रीलंकेला विजयासाठी २६१ रन्सचं आव्हान ठेवलं होतं.

त्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या लाहिरु थिरिमन्नेनं सेन्चुरी ठोकली. तर माहेला जयवर्धनेनं हाफसेंच्युरी झळकावली. थिरिमन्नेनं १०८ बॉल्समध्ये १३ फोरच्या मदतीनं १०१ रन्स केलं. तर जयवर्धनेनं ९३ बॉल्समध्ये ९ फोर आणि १ सिक्सरच्या मदतीनं ७५ रन्स केले.

याआधी लसिथ मलिंगाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानी बॅट्समननी अक्षरक्ष: गुडघे टेकले. ३ बाद १८ अशी बिकट अवस्था असताना कर्णधार मिस्बाह उल हक यानं फवाद आलमच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी १२२ रन्सची भागीदारी रचली.
फवाद आलमनं १३४ बॉल्समध्ये नॉटआऊट११४ रन्स केले. मग फवाद आलमनं उमल अकमलच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी ११५ रन्सची भागीदारी रचत पाकिस्तानला २६० रन्सवर मजल मारुन दिली.

श्रीलंकेकडून लसिथ मलिंगानं १० ओव्हरमध्ये ५६ रन्स देत पाच विकेट घेतल्या. याच कामगिरीसाठी मलिंगाला `मॅन ऑफ द मॅचचा` पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 8, 2014, 22:48


comments powered by Disqus