Last Updated: Thursday, April 10, 2014, 16:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, तो या वर्षीच्या क्रिकेट "बायबल` समजले जाणा-या "विस्डेन`च्या मुखपृष्ठावर झळकला आहे.
"विस्डेन`च्या १५१ व्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर झळकलेला सचिन पहिलाच भारतीय आहे, यापूर्वी तो "विस्डेन इंडिया`च्या दुस-या आवृत्तीवर झळकला होता. पिवळ्या रंगाच्या मुखपृष्ठावर सचिन वानखेडे स्टेडियमवर शेवटची कसोटी खेळून माघारी परतानाचे छायाचित्र आहे.
दरम्यान, आयपीएलच्या सुरवातीस "आयकॉन खेळाडू` म्हणून मुंबई इंडियन्स टीममध्ये आलेल्या सचिन तेंडुलकरचा आता रिटायर्डमेंटनंतरही "आयकॉन`चा दर्जा कायम राहिला आहे. आता तो टीमचा "आयकॉन` असेल.
मुंबई इंडियन्स संघाच्या उभारणीपासून सचिनचा वाटा आहे. तो संघासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलेला आहे. गतवर्षी मिळालेले विजेतेपद आणि त्याअगोदरचे चॅम्पियन्स विजेतेपद सचिनला बहाल करण्यात आले होते, असे मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी सांगितले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 10, 2014, 16:54