Last Updated: Saturday, August 25, 2012, 10:13
www.24taas.com,मुंबईमुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अंतरिम अध्यक्षपदी रवी सावंत यांची निवड झाली. यामुळे शरद पवारांना धक्का असल्याचे मानले जात आहे.
विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी मतदान झाले. पुढील आठ महिन्यांसाठी सावंत या पदावर असतील. त्यानंतर एमसीएच्या पुन्हा निवडणुका होणार आहेत. बाळ महादालकर गटाच्या सावंत यांनी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांचा पाच मतांनी पराभव केला. त्यामुले पवार यांनी विरोधकांनी धक्का दिल्याचे म्हटले जात आहे.
१७ सदस्यीय कार्यकारी समितीत सावंत कोषाध्यक्ष होते. आता मयंक खंडेलवाल यांच्याकडे कोषाध्यक्षपद देण्यात आले. सहसचिव नितीन दलाल विदेशात असल्याने निवडणुकीच्या वेळी उपस्थित नव्हते.
First Published: Saturday, August 25, 2012, 10:13