Last Updated: Monday, December 16, 2013, 20:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआयपीएल अर्थातच इंडियन प्रिमियर लीगचे माजी सुप्रीमो ललित मोदी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या रेसमध्ये ललित मोदी असणार आहेत.
यासाठी मोदींच्या वकीलांनी अर्जही भरला आहे. रामापल शर्मा यांच्या विरोधात मोदी उभे राहिले आहेत. १९ डिसेंबरला आरसीएची निवडणूक होणार आहे. ही लढत अतिशय चुरशीची होणार असल्याची शक्यता आहे.
३३ पैकी २४ मतं आपल्या बाजूनं असल्याचा दावा मोदींनी केला आहे. बीसीसीआयनं आजीवन बंदी घातल्यानंतर आता मोदी आरसीएच्या मार्फत पुन्हा बीसीसीआयमध्ये एंट्री घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 16, 2013, 20:53