Last Updated: Tuesday, July 16, 2013, 17:33
www.24taas.com, झी मीडिया, रांचीहेलिकॉप्टर शॉटचा शोध लावणारा महेंद्रसिंग धोनीचा मित्र सध्या आजारी असून या मित्राच्या मदतीसाठी धोनीने पुढाकार घेतला आहे. जुना मित्र आणि झारखंडचा माजी रणजी क्रिकेटर संतोष लाल याला सोमवारी बेशुद्ध अवस्थेत दिल्लीला नेण्यात आले. संतोष लाल याला अग्नाश्यासंबंधी आजार आहे.
धोनीचा मित्र आणि माजी प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांनी सांगितले की, गंभीर आजारी असलेल्या आपल्या बालपणाच्या मित्राची महेंद्रसिंग धोनीने विचार पूस केली. सध्या धोनी अमेरिकेत असून तो त्या ठिकाणाहूनच आपल्या मित्रासाठी शक्य ती मदत करीत आहे.
संतोष लाल याला गंभीर परिस्थितीत एअर अम्बुलन्सने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले. धोनीशिवाय संतोष लाल याचे दुसरे मित्र देखील त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सर्वांनी मिळून त्याचा इलाजासाठी पैसे जमा केले आहे.
धोनीने लहानपणी संतोष लाल सोबत रणजी सामने खेळले होते, संतोष लालने धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, July 16, 2013, 17:33