Last Updated: Thursday, November 8, 2012, 12:09
www.24taas.com, मुंबई टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत चक्क लाजला... माही रेसिंग टीम इंडिया या बाईक उद्घाटनाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर धोनीने लाजून उत्तर दिले. धोनीच बाईक प्रेम साऱ्यानाच ठाऊक आहे. धोनीला बाईकवरून फिरणं नेहमीच आवडतं, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बाईकचे कलेक्शन धोनीजवळ आहे.
धोनीच्या ह्याच कार्यक्रमात त्याची पत्नी साक्षी ही दिसली. धोनीला जेव्हा विचारण्यात आलं की, बाईक वर एकटं फिरण्यापेक्षा साक्षीला घेऊन फिरायला घेऊन जाता की नाही? त्याचवेळेस धोनीने लाजून लाजून चूर झाला. `हो मला फिरायला आवडतं, मात्र ते शक्य होत नाही.` असं उत्तर देत धोनीही मनमुरादपणे हसला.
धोनीच्या सुपरबाईक चॅम्पियनशीप टीमचं अनावरण करण्यात आलं. एमएसडी आरएन रेटींग टीम इंडिया बदलून `माही रेसिंग टीम इंडिया` असं नाव ठेवण्यात आलं. तसच नव्या दोन ड्रायव्हर सोबतही करार करण्यात आला. धोनीने पुढे हे स्पष्ट केलं की, एक रायडिंग स्कूल चालू करण्याचा आम्ही विचार करीत आहोत. आणि आशा आहे की, या सुपरबाईकवर आम्हांला भारतीय ड्रायव्हर दिसतील.
First Published: Thursday, November 8, 2012, 11:56