रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबई , Mumbai 44 th time Ranji Trophy final

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबई

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबई
www.24taas.com,नवी दिल्ली

मुंबई टीमने ४४ व्या वेळी रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय. सेमी फायनलमध्ये सर्विसेसविरूद्ध इनिंगच्या आघाडीने विजय मिळवत मुंबईने फायनल गाठली.

दिल्लीतील पालम इथं पावसाच्या व्यत्ययामुळे सहाव्या दिवसापर्यंत लाबंलेल्या या लढतीमध्ये अखेरच्या दिवशी सर्विसेसची इनिंग २४० रन्सवर ऑल आऊट करण्यात मुंबईला यश मिळाल. तत्पूर्वी मुंबईने ८ विकेट्स गमावत ४५४रन्स केल्या. मुंबईचा कॅप्टन अजित आगरकर आणि आदित्य तरेने शानदार सेंच्युरी झळकावल्या. तर अभिषेक नायर आणि सचिन तेंडुलकरने हाफ सेंच्युरी झळकावल्या.

मुंबईकडून सर्वाधिक पाच विकेट्स धवल कुलकर्णीने घेतल्या. तर शादृल ठाकूरने ३ विकेट्स घेतल्या. आता मुंबईत होणा-या फायनलमध्ये मुंबईची गाठ सौराष्ट्राशी पडणार आहे.

First Published: Monday, January 21, 2013, 14:06


comments powered by Disqus