मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक : मुंडे विरूध्द पवार?, Mumbai Cricket Association elections : Gopinath Munde X Sharad

मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक : मुंडे विरूध्द पवार?

मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक : मुंडे विरूध्द पवार?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भाजपचे नेते गोपिनाथ मुंडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा आज अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळीची एमसीए निवडणूक शरद पवार विरुद्ध गोपिनाथ मुंडे अशी होण्याची चिन्ह आहेत.

एमसीएच्या लढतीला आता चांगलाच राजकीय रंग चढला आहे. निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. गोपिनाथ मुंडे अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्याची शक्यता आहे त्यामुळे ही लढत अधिकच रंगतदार होणार यात कुठलीही शंका नाही.

दरम्यान, दोन्हीही नेत्यांनी अद्याप अर्ज भरलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आधी अर्ज कोण भरतो याकडे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 8, 2013, 14:21


comments powered by Disqus