मुंबई इंडियन्समध्ये लिंडल सिमन्स धडाका, Mumbai Indians sign Lendl Simmons

मुंबई इंडियन्समध्ये लिंडल सिमन्स धडाका

मुंबई इंडियन्समध्ये लिंडल सिमन्स धडाका
www.24taas.com, झी मीडिया, दुबई
इंडियन प्रीमिअर लीगच्या सातव्या एडिशनमध्ये सलग चार पराभवांचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सने संघात बदल करत जलद सक्सेनाच्या जागी वेस्ट इंडीजचा फलंदाज लिंडल सिमन्सचा समावेश केला आहे.

आयपीएलच्या टेक्निकल पॅनलने मंगळवारी मुंबई इंडियन्स अडमिनला खेळाडू बदली करण्याची परवानगी दिली. मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशासनाने खेळाडू बदलीबाबत कोणतेही कारण दिलेले नाही. सिमन्स मुंबईच्या संघात लगेच खेळू शकणार आहे.

सिमन्सचा यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कोणत्याही संघात समावेश नव्हता. त्यामुळे तो आता मुंबईच्या संघात सलामीचा फलंदाज म्हणून उतरणार आहे. यूएईमध्ये ३० एप्रिलपासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या सातव्या एडिशनमध्ये गतविजेत्या मुंबईचा आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांत पराभव झालेला आहे. मुंबईचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकलेला नाही. सिमन्सने आतापर्यंत वेस्ट इंडीजकडून 8 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 30 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 20:54


comments powered by Disqus