Last Updated: Friday, September 27, 2013, 19:13
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक तर लढता येईल पण, अध्यक्षपदाची सूत्रं मात्र हाती घेता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठानं दिलाय.
न्यायमूर्ती ए. के. पटनाईक आणि जगदीश सिंग खेहार यांनी एन. श्रीनिवासन यांच्या बीसीआय निवडणूक लढवण्याविषयी हा निर्णय दिलाय. एन. श्रीनिवासन हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात परंतु, जर ते निवडून आले तरी इंडियन प्रिमिअर लीगच्या भ्रष्टाचाराप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात त्यांना क्लीन चीट मिळेपर्यंत त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलंय.
‘द बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ अर्थात बीसीसीआयच्या २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक बैठकीलाही सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिलाय.
‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहार’नं (CAB) श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन यांना तामिळनाडू, कर्नाटक, केरला, हैदराबाद, आंध्रप्रदेश आणि गोवा या दक्षिण झोन्सच्या समित्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, September 27, 2013, 18:32