एन. श्रीनिवासन आयसीसीचे नवे अध्यक्षN Srinivasan to be ICC Chairman from July

एन. श्रीनिवासन आयसीसीचे नवे अध्यक्ष

एन. श्रीनिवासन आयसीसीचे नवे अध्यक्ष
www.24taas.com, वृत्तसंस्था, सिंगापूर

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या अध्यक्षस्थानी निवड झाली आहे. जुलै २०१४मध्ये ते आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारणार असून दोन वर्षांसाठी ते या पदावर असतील.

सिंगापूर इथं झालेल्या आयसीसीच्या मीटिंगमध्ये श्रीनिवासन यांची आयसीसीच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. या मीटिंगमध्ये आयसीसीनं नव्या आर्थिक प्रस्तावालादेखील मंजूरी दिल्यानं भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आयसीसीमध्ये विशेष अधिकार मिळणार आहेत.

या प्रस्तावाला ८ क्रिकेट बोर्डाने पाठिंबा दिला तर पाकिस्तान आणि श्रीलंकेनं या विरोधात मत दिलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 8, 2014, 15:09


comments powered by Disqus