Last Updated: Wednesday, July 31, 2013, 22:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईएन. श्रीनिवासन हे पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आयपीएल फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्षपद श्रीनिवासन यांना सोडावे लागले होते.
फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने नेमलेल्या दोन सदस्यीय समितीने श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांना क्लिन चिट दिली आहे. त्यामुळेच श्रीनिवासन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान मुंबई हाय कोर्टाने बीसीसीआयला फटकारत ही समिती अवैध असल्याचं म्हटल होत. त्यामुळे बीसीसीआयने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरु केली आहे.
तर हेकेखोर श्रीनिवासन हे कोर्टाच्या आदेशला न जुमानता पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारणार असून 2 ऑगस्टला होणा-या बीसीसीआच्या वर्किंग कमिटीच्या मीटिंगलाही ते उपस्थित राहणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 31, 2013, 21:46