Last Updated: Tuesday, December 10, 2013, 18:34
www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाला तोंड दाखवायलाही जागा उरलेली नाही. यातच दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी भारताच्या दुखऱ्या भागाला डिवचण्याचं काम केलंय.
‘सचिन तेंडुलकर टीम इंडियात नाही हे आमच्यासाठी चांगलंच आहे... ड्रेसिंग रुममध्येही सचिनचा प्रभाव नसल्यानं भारताविरुद्ध योजना आखणं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आणखीनच सोप जाणार आहे’ असं डोमिंगो यांनी म्हटलंय.
गेल्या महिन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटविश्वातून आपली निवृत्ती जाहीर केलीय. याच सचिननं २०१०-११ मध्ये मागच्य दक्षिण आफ्रिकेच्या दोऱ्यामध्ये खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांत दोन सेन्चुरी झळकावल्या होत्या. ‘सचिन हा टीम इंडियासाठी मोठा आधार होता. खेळाच्या मैदानावरच नाही तर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्येही त्याचा आश्वासक प्रभाव जाणवत राहायचा... आता सचिनला बाद करावं लागणार नाही, ही दक्षिण आफ्रिकेच्या पथ्यावर पडणारीच गोष्ट आहे’ असं डोमिंगो यांनी म्हटलंय.
‘भारताची वेगवाग गोलंदाजांसमोर उडणारी दाणादाण लक्षात आल्यानं दक्षिण आफ्रिकेनं या गोष्टीचा अधिक फायदा करुन घेण्याचं ठरवलं... त्याविषयी आम्ही चर्चाही केली होती’ असं डोमिंगो यांनी सांगितलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 10, 2013, 18:28