वर्ल्डकप टी-२०ची अधिकृत वेबसाईट लॉन्च , official website of world cup t 20

वर्ल्डकप टी-२०ची अधिकृत वेबसाईट लॉन्च

वर्ल्डकप टी-२०ची अधिकृत वेबसाईट लॉन्च
www.24taas.com, कोलंबो
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं श्रीलंकेत होणा-या टी २० वर्ल्डकपची अधिकृत वेबसाईटचं आज उदघाटन केलंय. १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत वर्ल्डकप मॅच रंगणार आहे. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार, या वर्ल्डकपची प्रत्येक अपडेट तुम्हाला मुख्य वेबसाईटवरून म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट आयसीसी डॉट कॉम (www.icc.com) वरून या वर्ल्डकपच्या साईटवर जाता येईल.

आसीसीच्या माहितीनुसार, या साईटवर टूर्नामेंटची प्रत्येक खबरबात आणि त्या संबंधी माहिती उपलब्ध असेल. याच निमित्तानं काही स्पर्धाही आयोजित केल्या गेल्यात त्याही या वेबसाईटवर पाहायला मिळतील. या साईटच्या साहाय्यानं टूर्नामेंटमधल्या प्रत्येक मॅचचा व्हिडिओही पाहाता येईल. यामध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही टीमचा समावेश असेल. लाईव्ह मॅचही इथं पाहता येणार आहे.

आयसीसीचे महाप्रबंधक कॅम्पबेल जेमीसन यांनी म्हटलंय की, आयसीसी वर्ल्डकप टी २० चा आतूरतेनं वाट पाहतेय. आंतरराष्ट्रीय स्तरावार क्रिकेट प्रेमींना या मॅचची प्रत्येक अपडेट मिळण्यासाठी वेबसाईट लॉन्च करण्याचा निर्णय घेतला गेलाय. याशिवाय क्रिकेटप्रेमी या साईटच्या फेसबूक पेजवरही माहिती मिळवू शकतात. त्यासाठी फेसबूकमध्ये डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट आयसीसी डॉट कॉम/क्रिकेट आयसीसी आणि ट्विटरवर ‘क्रिकेट आयसीसी’वरही माहिती मिळवू शकतात.

First Published: Wednesday, September 12, 2012, 17:46


comments powered by Disqus