Last Updated: Saturday, February 2, 2013, 20:39
www.24taas.com, जोहान्सबर्ग आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानला सर्वात कमी म्हणजे ४९ रन्समध्ये गुंडाळण्याची कामगिरी दक्षिण आफ्रिकेने केलीय.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आठ धावांत सहा विकेट घेत पाकिस्तानचा पहिला डाव ४९ रन्समध्ये आटोपला. पाकिस्तानची कसोटी क्रिकेटमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
जोहान्सबर्ग येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानने यजमान दक्षिण दक्षिण आफ्रिकेचा डाव २५३ रन्यमध्ये गुंडाळला होता. त्यानंतर दुस-या दिवशी शनिवारी खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांना फारशी चमक करता आलेली नाही.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने चांगली कामगिरी करत आठ धावांत सहा फलंदाजांना घरचा रस्ता दाखविला. तर व्हेरॉन फिलँडर आणि जॅक कॅलीस यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत पाकिस्तानचा ४९ रन्समध्ये खुर्दा केला.
First Published: Saturday, February 2, 2013, 20:39