Last Updated: Tuesday, January 29, 2013, 16:49
www.24taas.cm, भुवनेश्वर कडक पोलीस सुरक्षेत पाकिस्तानी महिला क्रिकेट टीम आयसीसी वर्ल्डकपसाठी भुवनेश्वरमध्ये दाखल झाली. त्यानंतर ही टीम कटककडे रवाना झाली. मुंबई होणारे सामने आता मुंबईऐवजी कटकमध्ये आयोजित करण्यात आलेत.
पाकिस्तानी महिला क्रिकेट टीम पूर्ण सुरक्षेसह कटकच्या बाराबती स्टेडीयम वर पोहचली, असे पोलीस आयुक्त सुरेश रॉय यांनी सांगितले. खेळाडू तिथेच थांबून सराव करतील. याबाबत, सध्यातरी कुठेही कोणत्याही प्रकारचा विरोध दर्शवला गेलेला नाही. ‘उत्कल भारत’ संस्थेचे काही कार्यकर्ते विमानतळावर विरोध दर्शवण्यासाठी एकत्र आले. परंतु सुरक्षा रक्षकांनी त्यांना तेथून हटवलं. संघ परिवार आणि स्थानिक पक्षांकडून पाकिस्तानी खेळाडूंना विरोध दर्शवणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन बिजू पटनायक विमानतळावर आणि नजीकच्या भागात कडेकोड सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार ६०० पोलिसांना याठिकाणी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलंय. यामध्ये सुरक्षा बटालियनचे काही जवान आणि ओडिसा पोलिसांचाही समावेश आहे.
First Published: Monday, January 28, 2013, 17:48