मॅचनंतर पाक खेळाडूंच्या रुममध्ये कॉलगर्ल्स!, pakistani cricketers used to take call girls in room after match in ba

मॅचनंतर पाक खेळाडूंच्या रुममध्ये कॉलगर्ल्स!

मॅचनंतर पाक खेळाडूंच्या रुममध्ये कॉलगर्ल्स!

www.24taas.com,ढाका

बांग्लादेश प्रिमिअर लीगमध्ये खेळणारे काही पाकिस्तानी खेळाडू मॅच पार्टीनंतर कॉल गर्ल्साला रुममध्ये घेऊन जायचे, तर अझर मेहमूद श्रीलंका प्रिमिअर लीगमध्ये मॅच फिक्सिंग करायचा, अशी खळबळजनक खुलासा ढाका ग्लॅहडिएटर्सचे मीडिया मॅनेजर मिनहाजुद्दीन यांनी केला आहे.

एका स्टिंग ऑपरेशनमध्ये् मिनहाजुद्दीन यांनी पाकिस्तानी खेळाडूंची पोलखोल केली आहे. शाहिद आफ्रिदी, राणा नावेद, अहमद शहजाद हे सामना संपल्याननंतर कॉल गर्ल्स खोलीत घेऊन जायचे. तसेच बांग्लादेशचा सलामी फलंदाज तमीम इक्बाल नेहमी दुबई आणि मलेशियामध्ये सुट्या घालवतो आणि हवालाच्या माध्योमातून बांग्लादेशाहून पैसा मागवितो, अशी माहिती मिनहाजुद्दीन यांनी उघड केली आहे.

अझर मेहमूद यावर्षी आयपीएलमध्‍ये खेळला होता. ब्रिटनचे नागरिकत्त्व प्राप्ता केल्याचे त्याने बीसीसीआयला कळविले होते. तसेच तो पाकिस्ता‍नी संघाकडून खेळत नाही. त्या मुळे त्याला आयपीएलसाठी परवानगी देण्यात आली होती. त्याने श्रीलंका प्रिमिअर लीगमध्ये फिक्सिंग केल्याचा दावा मिनहाजुद्दीन यांनी केला आहे.

First Published: Tuesday, October 9, 2012, 18:23


comments powered by Disqus