Last Updated: Wednesday, August 15, 2012, 17:46
www.24taas.com, मुंबईभारतीय मॉडेल लीना कपूर हिने पाकिस्तानचे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पंच असद रउफ यांच्यावर शारिरीक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या मॉडेलच्या माहितीनुसार, लग्नाचे आमीष दाखवून असद यांनी १५ वेळा सेक्स केल्याचे तिने म्हटले आहे.
आजवर अनेक प्रशिक्षकांवर शारीरिक शोषणाचे आरोप झाले आहेत. मात्र आता पाकिस्तानचे आतंरराष्ट्रीय पंच असद राऊफ यांनी शारिरिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईच्या एका मॉडेलने शारीरिक शोषण केल्याऊचा आरोप असद राऊफवर केला आहे. लीना कपुर असे या मॉडेलचे नाव असून ती ओशिवारा येथे राहते. वर्सोवा पोलिस ठाण्यापत तिने तक्रार दाखल केली आहे.
तिने राऊफ यांच्या्वर आरोप केला आहे की, लग्नाीचे वचन देऊन राऊफ यांनी शारीरिक संबंध बनविले. श्रीलंकेत सहा महिन्याापूर्वी राऊफ यांची भेट झाली होती. पार्टीत त्यांवनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यालनंतर हळूहळू दोघांमध्येा प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन दिवस श्रीलंकेत ते सोबत होते, असे लीनाने म्हटले आहे.
First Published: Wednesday, August 15, 2012, 17:45