Last Updated: Tuesday, May 14, 2013, 12:10
www.24taas.com, नवी दिल्ली आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू-काश्मीरचा पहिलाच क्रिकेटर परवेज रसूलनं आपल्या जर्सीवर दारूच्या ब्रॅन्डचा लोगो लावण्यास नकार दिलाय. इस्लाममध्ये दारूला स्थान नाही, आणि मी दारूचाच प्रसार केला तर लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील, असं परवेजनं म्हटलंय. परवेज पुणे वॉरियर्स या संघाकडून खेळतोय.
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध खेळताना गेल्या आठवड्यात आयपीएल मॅच खेळणाऱ्या २४ वर्षीय रसूलनं दारूच्या बँन्डचा लोगो लपवण्यासाठी आपल्या जर्सीवर टेप लावला. तो म्हणतो, ‘मी लोगो लपवण्यासाठी टेप लावला. यावर लोकांनी मी असं का करतोय याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं... माझ्या धर्मात दारू पिणं अमान्य आहे. त्यामुळे मी दारुच्या बँन्डचा प्रचार करणार नाही. माझ्यासाठी भावनांना खूप महत्त्व आहे आणि माझं कुटुंब माझ्या या निर्णयामुळे सुखावलंय.’
रसूल १२ मॅचपर्यंत डगआऊटमध्ये बसून राहिला. त्यानंतर त्याची निवड आयपीएलसाठी झाली. त्यानं पहिल्याचं मॅचमध्ये चार ओव्हर्समध्ये २३ रन्स देऊन जॅक कॅलिसची महत्त्वपूर्ण विकेट घेतली तसंच बॅटींग करताना एक रन काढला. मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसऱ्या मॅचमध्ये रसूलला केवळ एक ओव्हर मिळाली. दहाव्या नंबरवर तो बॅटींगसाठीही आला तेव्हा त्यानं चार रन्स काढले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 14, 2013, 09:56