अश्लील MMS प्रकरणी प्रविण कुमारच्या घरावर धाड, police raid in Pravin kumar flat about MMS

अश्लील MMS प्रकरणी प्रविण कुमारच्या घरावर धाड

अश्लील MMS प्रकरणी प्रविण कुमारच्या घरावर धाड
www.24taas.com, मेरठ

टीम इंडियाचा गोलंदाज प्रविण कुमार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आणि घटनादेखील तशीच गंभीर घडली आहे. दोन मुलींच्या अश्लील एमएमएस आणि व्हिडिओ क्लिपिंग प्रकरणात पोलिसांनी त्याच्या दिल्ली रोड स्थित फ्लॅटवर छापा मारला आहे.

प्रविणकुमारचा मोठा भाऊ विनयच्या म्हणण्यानुसार, प्रविणने हा फ्लॅट त्याच्या मामाचा मुलगा पुनीतला भाड्याने दिला आहे. इंचोली पोलिसांनी या प्रकरणात बुधवारी दिल्ली रोड स्थित क्रिकेटर प्रविणकुमारच्या फ्लॅटवर धाड टाकली. पोलिसांच्या माहितीनुसार, ते दोन वेळा सुपरटेकच्या चौकशीसाठी गेले होते मात्र तेथील संबंधित फ्लॅटला कुलूप दिसून आले.

प्रविणचा मोठा भाऊ विनय कुमारने अश्लील एमएमएस आणि अश्लील व्हिडिओ क्लिपिंगच्या प्रकरणात आपल्याला काहीही माहिती नाही, असे म्हटले आहे. मात्र हे जरुर स्पष्ट करण्यात आले आहे की, पुनीत चौधरी सुपरटेकमधील ज्या फ्लॅटमध्ये राहत आहे तो फ्लॅट प्रविणकुमारचाच आहे. असे असले तरी प्रविणकुमारचा यात थेट कोणताही संबंध नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

First Published: Thursday, April 4, 2013, 18:03


comments powered by Disqus